Sant Sahitya

संत तुकाराम गाथा या ॲपच्या भरघोस यशानंतर आम्ही संत साहित्य (santsahitya.in) नावाची वेबसाईट नव्याने तयार करत आहोत. कारण एक गाथा ॲप मध्ये बसू शकते परंतु अनेक गाथा व संतांचे विविध साहित्य ॲपमध्ये बसणे अशक्य आहे. त्यामुळे वेबसाईटच्या माध्यमातून विविध संतांचे गाथा, हरिपाठ व इतर  गद्य रुपी साहित्य आम्ही या वेबसाईट मध्ये समाविष्ट करणार आहोत .कालांतराने महाराष्ट्रा बरोबरच देशभरातील इतर भाषेतील संतांचे साहित्य याच वेबसाईटवर आम्ही समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत राहू.

संतसाहित्य संगणकीकृत करण्याचा खूप जणांनी भक्ती भावाने प्रयत्न केलेला आहे. परंतु  हे करत असताना काही चुका झालेल्या आढळतात .संतसाहित्यामध्ये चूका कमी असाव्यात किंबहुना त्या असूच नयेत असा आमचा हेतू आहे .इथे आम्ही या चुका कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. वेबसाईट वरती जिथे अभंग आहेत त्या प्रत्येक अभंगाच्या खाली आम्ही कमेंट बॉक्स दिलेला आहे. या कमेंट बॉक्समध्ये आपणास आढळलेल्या चुका आपण आमच्यापर्यंत पोहोचू शकता. जेणेकरून  त्या चुकांची दुरुस्ती करून तो अभंग किंवा ते संत साहित्य बिनचूक असेल असा आमचा प्रयत्न आहे.

या वेबसाईट मध्ये आपण आपले कीर्तन, प्रवचन,भजन, हरीनाम सप्ताह, पारायण  इ. महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी असेलेले कार्यक्रम तसेच कार्यक्रमाच्या पत्रिका समाविष्ट करू शकता. याचा फायदा असा होईल की महाराष्ट्रभरामध्ये तसेच देशामध्ये कुठे कोणता कार्यक्रम चालू आहे याची माहिती सर्वांना वेबसाईट वर पहावयास मिळेल.

तसेच आपणास संतसाहित्य या वेबसाईटवर महाराष्ट्रात अध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले विविध ह-भ-प, गायनाचार्य, हार्मोनियमवादक, मृदंगाचार्य यांची माहिती देत आहोत.या सोबत त्यांचे सविस्तर कार्य. त्यांचा मोबाईल नंबर व पत्ता  वेबसाईटवर समाविष्ट करणार आहोत.यामुळे महाराष्ट्रमध्ये अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींची ओळख महाराष्ट्राला करून देण्यास मदत होईल.त्याचा फायदा या व्यक्तींना संपर्क करण्यासाठी सोपे होईल.

आपण कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, हार्मोनियमवादक, मृदंगाचार्य असाल तर तुमची माहिती वेबसाईटवर ह भ प नोंदणी  या लिंक मध्ये जाऊन समाविष्ट करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *